-सुकेळी खिंडीत सुदैवाने जीवितहानी टळली, -वाहतुकीचा खोळंबा
प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडनजीक सुकेळी खिंडीत गणेशभक्तांची कार उलटल्याची घटना शुक्रवारी घडली. अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. पराग श्रीधर पटियाने (35, मुंबई-विरार) हे अल्टो कारमधून (एमएच 04/बी.वाय 2234) आई-वडील व पत्नीसह मुंबई येथून माणगावकडे येत होते. सुकेळी खिंडीत वळणावर अचानक ब्रेक मारल्यामुळे कार स्लीप होऊन उलटली. वाकण टॅपचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम भोईर व सहकाऱयांनी घटनास्थळी जात मदतकार्य केले. पेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला केल्यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत झाली.