देवगडकडे जाणारी खासगी बस पेटली, सर्व 25 प्रवासी सुखरुप
वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळ शुक्रवारी सकाळी ‘बर्निंग बस’चा थरार अनेकांनी अनुभवला. बसच्या मागच्या चाकाला आग लागल्याचे चालकाच्या लक्षातच न आल्याने त्याच स्थितीत सुमारे 5 किमी अंतरापर्यंत ही बस धावली. मागून येणाऱया वाहनचालकाने याबाबतची माहिती दिल्यानंतर पारेख पेट्रोलपंपाजवळ बस थांबवण्यात आली. या ठिकाणी आगीचा भडका उडून पूर्ण बस पेटली. मात्र तत्पुर्वी प्रवशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
साईश्रृती कंपनीची खाजगी आराम बस 25 प्रवाशांना घेवून मुंबईहून-देवगडकडे निघालेली होती. ही बस बस विरार येथील धावू नानू बोडके (35) चालवत होता. संगमेश्वरजवळच्या पारेख पेट्रोलपंपासमोर सकाळी बस आली असता अचानक बसने पेट घेतला. बसला आग लागत असल्याचे लक्षात येताच चालक बोडके याने बस थांबविली. बसमधील 25 प्रवाशांनी गाडीमधून तत्काळ खाली उतरण्यात सांगितले. बस पेटत असल्याचे पाहून प्रवाशांनीही आरडोओरड केली. नजीकच्या मोहल्ल्यातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व प्रवाशांना खाली उतरवत त्यांचे सामान गाडीमधून खाली घेण्यात आले.
बसला लागलेली ही आग भडकतच गेली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. बस वाचवणे अशक्य बनल्याने ते प्रयत्न सोडून देण्यात आले. ‘बर्निंग बस’च्या या थरामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होती. शास्त्राrपूलापर्यंत आणि संगमेश्वरबस स्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आराम बसला आग लागल्याचे समजताच संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरेंसह विभूते, मुरुडकर, कोष्टी आदी घटनास्थळी दाखल झाले होते. आराम बसला पूर्ण आग लागल्याने सुमारे 35 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बस पूर्ण जळून आग विझल्यानंतर ती रस्त्यामधून हटविण्यात आली. त्यानंतर ठप्प झालेली वाहतुक पुन्हा सुरळीत झाली.
ही आग शॉर्ट सर्कीटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीच्या कारणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून अपघाताची नोंद संगमेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पाच किमी बर्निंग बसचा थरार संगमेश्वरजवळच्या धामणी येथे आली असता बसच्या मागील चाकाला आग लागली. अशा स्थितीतच बस 5 किमी धावत संगमेश्वर पारेख पेट्रोलपंपाजवळ आली. बस पुढे जात असताना आग भडकत होती मागील येणाऱया इनोव्हा कारने बसला आग लागली असल्याचे सांगितले असे चालक धावू बोडके याने सांगितले