2017-2018 मध्ये भरविण्यात आले होते मेळावे
प्रतिनिधी /बेळगाव
येथील मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन भरविते. त्याला तोडीस तोड म्हणून म. ए. समितीच्या नेत्यांनी व्हॅक्सिनडेपो येथे मेळावा भरविला आणि त्यांना सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे म. ए. समितीच्या नेत्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले. त्या प्रकरणामध्ये म. ए. समितीच्या नेत्यांना जामीन मंजूर केला आहे.
टिळकवाडी पोलिसांनी 2017 व 2018 मध्ये म. ए. समितीने मेळावा भरविला म्हणून म. ए. समितीचे दीपक दळवी, मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, निंगोजी हुद्दार यांच्यासह इतरांवर दोन गुन्हे नोंदविले होते. या सर्वांवर जेएमएफसी चतुर्थ न्यायालयामध्ये आता दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर ऍड. महेश बिर्जे यांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने प्रत्येकी 10 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र तसेच तितक्मयाच रकमेचा एक जामीनदार यावर जामीन मंजूर केला आहे. या खटल्यामध्ये ऍड. महेश बिर्जे, ऍड. एम. बी. बोंदे, ऍड. शंकर पाटील, ऍड. वर्षा जवळकर हे काम पाहत आहेत.