शिवसेनेचे मराठी भाषिकांना आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमध्ये होणाऱया कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाचा निषेध म्हणून मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने भरविण्यात येणाऱया मराठी भाषिक महामेळाव्याला बेळगाव जिल्हा शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. दि. 13 रोजी व्हॅक्सिन डेपो मैदानावर मोठय़ा संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
शिवसेनेच्या विभागीय कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर होते. कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी भाषिकांनी भगव्या ध्वजाखाली एकवटणे आवश्यक आहे. त्यामुळे हजारोंच्या उपस्थितीत मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा संघटक रविंद्र जाधव, ज्ये÷ शिवसैनिक महेश टंकसाळी, तालुका प्रमुख सचिन गोरले, मजगाव विभागप्रमुख प्रसाद काकतकर, शहापूर विभाग प्रमुख राजू कणेरी, विजय सावंत, रमेश माळवी, बाळासाहेब डंगरले, विनय कोवाडकर, वैजनाथ भोगण, राजेश कदम, रवी धनुचे, राहुल कुडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.