प्रतिनिधी / बेळगाव
महानगरपालिकेसमोर लावण्यात आलेल्या अनधिकृत ध्वजाबाबत सोमवार दि. 8 रोजी मराठी भाषिकांच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी गावा गावात जागृती करण्यात येत आहे. बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने मागील दोन दिवसांपासून बसुर्ते व मजगाव या दोन गावांमध्ये जागृती करण्यात आली.
मराठी भाषिकांवर ज्या ज्या वेळी अन्याय झाला. त्या त्या वेळी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. यावेळीही महामोर्चामध्ये अधिकाधिक मराठी भाषिकांचा सहभाग व्हावा यासाठी शिवसेना गावोगावी जाऊन जागृती करीत आहे. महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार या जागृती बैठकांवेळी केला जात आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, उप शहरप्रमुख प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, विजय सावंत, बाळू घुमटे, पांडुरंग सावंत, बसवंत बेनके, उमेश नाईक, लक्ष्मण कुऱहाडे, भरमा हन्नूरकर, गुंडू गावडे, सोमनाथ हदगल, रामा बेनके यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.