ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील हे होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाले आहे. ही माहिती शंकरराव पाटील यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे.
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या पत्नी आणि नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यानंतर मंत्री शंकरराव गडाख पाटील स्वत: 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना शंकरराव पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, नमस्कार , काल 17 जुलै रोजी माझी पत्नी यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून आज शनिवारी 18 जुलैला माझा स्वब दिलेला आहे. त्यामुळे मी स्वतः होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे . आपणही आपल्यासह कुटूंबियांची काळजी घ्या. घरी रहा, सुरक्षित रहा… असेही त्यांनी सांगितले आहे.
तसेच गडाख यांच्या वाहन चालकाची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान, याआधी मंत्री अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात केली आहे.