डान्सचा टॉप गियर धर्मेश सर म्हणजे सर्व नफत्यप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहेत. खूप मेहनत करून आणि आपल्या टॅलेंटच्या जोरावर धर्मेश सरांनी यशाची शिखरं गाठली. त्यांच्या या यशात त्यांना पहिल्या पावलापासून साथ दिली ती त्यांच्या वडिलांनी. त्याचे वडील हे त्यांचे खरे आदर्श आहेत. या आठवडय़ातल्या महाराष्ट्राज बेस्ट डान्सरच्या भागाची थीम आहे पहिला अनुभव. स्पर्धक प्रथमेश आणि त्याचा गुरू आकाश यांनी धर्मेश सरांचा पहिला इंटरह्यू आणि त्यांचा एकंदरीत प्रवास दाखवला आहे. त्यात त्यांना त्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा पाठिंबा कशा प्रकारे दिला आणि त्यांचा पुढचा प्रवास कसा घडत गेला, हे नफत्यातून दाखवलं आहे. या सादरीकरणाच्या शेवटी धर्मेश सरांचे वडील मंचावर आले आणि त्यांना पाहून धर्मेश सर भावुक झाले. धर्मेश सरांसाठी हे एक सरप्राईज होतं. आपल्या मुलाची प्रगती बघून आणि त्याला परीक्षकाच्या खुर्चीत बसलेला पाहून त्याचे वडील खूप खूश होते. त्यांच्या वडिलांनी हेही सांगितलं की, त्यांची फार इच्छा होती की धर्मेश सरांनी एखाद्या मराठी कार्यक्रमाचं परीक्षण करावं. महाराष्ट्राज बेस्ट डान्सर आणि सोनी मराठी वाहिनी यांच्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे आणि यासाठी त्यांनी सोनी मराठी वाहिनीचे आभार मानले. हे सगळे क्षण महाराष्ट्राज बेस्ट डान्सर, सोमवार- मंगळवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत.
Previous Articleदेवेंद्र, निमिशा यांना सुवर्णपदके
Next Article राम मंदिर उभारणीच्या कार्याला वेग
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.