ऑनलाईन टीम / मुंबई :
उत्तर प्रदेश आणि हरयाणापाठोपाठ आता महाराष्ट्रातही अजय देवगणचा ‘तान्हाजीः द अनसंग वॉरिअर’ करमुक्त म्हणून घोषीत करण्यात आला आहे.
या चित्रपटाला टॅक्स फ्री केलं जावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यासंदर्भात पत्रसुद्धा लिहिलं होतं.
ते पत्रात म्हणाले होते की, तान्हाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात तसेच हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा.
दरम्यान, जनतेच्या आग्रहानंतर महाराष्ट्रातही आज हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. 10 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 180 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.