ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात शनिवारी 2940 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 65 हजार 168 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 2197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 1084 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 28 हजार 081 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 34 हजार 881 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 99 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्याच्या रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.3 दिवस होता. आता तो 17.5 दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 43.07 % आहे. तर मृत्यू दर 3.37 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 3 लाख 68 हजार 439 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 65 हजार 168 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 420 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.