ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 346 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर 2 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 14 हजार 641 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 148 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 14,641 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 1555 पोलीस अधिकारी आणि 13,086 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 11 हजार 752 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1187 पोलीस अधिकारी आणि 10,565 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 2741 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 353 पोलीस अधिकारी आणि 2388 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 148 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 15 पोलीस ऑफिसर आणि 133 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.