- मागील 24 तासात 8,992 नवे रुग्ण; 200 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 8 हजार 992 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 10,458 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 200 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 59 लाख 00 हजार 440 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.03 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,35,65,119 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 40 हजार 968 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,27,243 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,756 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 12 हजार 231 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.