ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या घट होताना दिसत आहे. राज्यात मागील 24 तासात 10 हजार 891 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 16,577 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 295 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची वाढती संख्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 80 हजार 925 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.35 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.73 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,65,08,967 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,52,891 (15. 86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11,53,147 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,225 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 67 हजार 927 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.