ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील मंदिरे, देवस्थान सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आणि अध्यात्मक समन्वय आघाडीने आज राज्यात घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची सुरुवात डोंबिवलीमध्ये करण्यात आली.
या सोबतच पुणे, नाशिक, बीड, कोल्हापूर, औरंगाबाद मधील भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरांसमोर मंदिरं सुरु करण्याच्या मागणी करत घंटानाद आंदोलन केले. यावेळी त्यांनी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी घोषणाबाजी देखील केली.
पुणे शहरातील सारसबाग मंदिराच्या गेटवर भाजप कार्यकर्त्यांकडून घंटनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्व मंदिरे सुरू करावीत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
दरम्यान, या आंदोलनात भाजपसह विश्व हिंदू परिषदही सहभागी आहे. अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय वारकरी मंडळ, वारकरी महामंडळ, अखिल भारतीय पुरोहित संघ, जय बाबाजी भक्त परिवार यांसह वारकरी, महानुभाव, लिंगायत, जैन, शीख संप्रदायाच्या अनेक संप्रदायांची प्रमुख मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरे-स्थानक, बौद्ध विहार यांच्या प्रवेशद्वारांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.