ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्र सरकारनंतर आता महाराष्ट्र सरकारकडूनही अनलॉक ऑक्टोबर गाईडलाईन्सला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
याआधी केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक 6 साठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याअंतर्गत अनलॉक 5 मधील गाईडलाईन्स 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत आता ठाकरे सरकारने देखील हा निर्णय घेतला आहे. कन्टोनमेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. याआधी मिशन बिगिन अंतर्गत अनेक निर्बंध हटवून विविध सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या ज्या कामांसाठी परवानगी देण्यात आली होती, ती कामे आताही चालूच राहतील. तसेच या संबंधात जारी करण्यात आलेले आदेश नोव्हेंबर अखेरपर्यंत कायम राहतील, असे असले तरी कन्टोनमेंट झोनमध्ये कडक नियम असणार आहेत, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.