कोरोनाबळींची संख्या 20 हजारांवर
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात 11,111 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 95 हजार 865 वर पोहचली असून, मृतांचा एकूण आकडा 20 हजार 037 एवढा आहे.
आज दिवसभरात 8837 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 4 लाख 17 हजार 123 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 58 हजार 395 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 288 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 % आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.36 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 31 लाख 62 हजार 740 नमुन्यांपैकी 5 लाख 95 हजार 865 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10 लाख 53 हजार 897 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 38 हजार 203 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.