ऑनलाईन टीम / मुंबई :
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून महाराष्ट्र सरकारने उद्या (दि.7) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
राज्य सरकारने यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दु:खद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 (सन 1981 चा अधिनियम 26) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.