ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मंगळवारी 3214 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 39 हजार 10 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मागील चोवीस तासात 1925 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. तर एकूण 69 हजार 631 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50.9 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 4.67 इतके आहे. सध्या राज्यात 62,833 सक्रिय रुग्ण आहेत.
मंगळवारी राज्यात 248 मृत्यूंची नोंद झाली. त्यातील 75 मृत्यू हे मागील 48 तासातील आहेत, तर अन्य 173 मृत्यू मागील काळातील आहेत. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 6 हजार 531 वर पोहोचला आहे.
तर मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 68,410 इतकी असून आतापर्यंत 3844 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 34 हजार 576 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 29, 982 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सध्या राज्यात 6 लाख 5 हजार 141 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 26 हजार 572 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.