ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली आहे. मागील 24 तासात राज्यात 6 हजार 258 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 12 हजार 645 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 254 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 60 लाख 58 हजार 751 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.54 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.
- 82,082 रूग्णांवर उपचार सुरु
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,71,76,715 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,76,057 नमुने (13.3 %) पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,98,933 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,456 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 82 हजार 082 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.