ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 342 वर पोहोचली आहे.
आज पुण्यात दोन तर बुलढाण्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दोन नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. या दोघांवर नायडू मध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, देशात दिवसेंदिवस कोरोना चा संसर्ग वाढत आहे. त्या पार्शवभूमीवर संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. अकर्षक सेवा वगळता सर्व दुकाने, कारखाने, उद्योग बंद ठेवण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत 17 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात बसून सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.