ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 1008 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आता 11 हजार 506 वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 485 आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरून याबाबातची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 1879 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 9 हजार 841 रुग्णांवर राज्यातील विविध भागांतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 1 लाख 53 हजार 125 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 40 हजार 587 जणांचे नमुने निगेटिव्ह आले. तर 11 हजार 506 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 63 हजार 26 लोक होम क्वारंटाइन असून 11 हजार 677 लोक हे संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.