ऑनलाईन टीम / मुंबई :
संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव फैलावत चालला आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाबाधितांच्या संख्येत तर दिवसेंदिवस भर पडत आहे. आज पुन्हा 121 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 455 वर पोहचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
आज वाढलेल्या 121 रुग्णांमध्ये मुंबईतील 92, नवी मुंबई 13, ठाण्यात 10, रायगडमध्ये एक आणि वसई विरार मध्ये कोरोना चे पाच रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई व पुण्यात ही संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील बराचसा भाग व पुण्यातील 21 ठिकाण सील करण्यात आली आहेत.
तसेच घराबाहेर पडू नका असे आवाहन ही करण्यात आले आहे. आणि आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे लागले तर मास्क घालून च बाहेर पडावे असे आदेश देण्यात आले आहेत.