ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 8308 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 लाख 92 हजार 589 इतकी झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
काल एका दिवसात एकूण 2217 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 1 लाख 60 हजार 357 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.81 टक्के इतके आहे. तर राज्यात एकूण 1 लाख 20 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कालच्या दिवसात 258 जणांचा मृत्य झाला. तर आतापर्यंत 11, 452 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 3.91 टक्के इतका आहे.
आतापर्यंत 14 लाख 84 हजार 630 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 2,84,281 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7 लाख 24 हजार 602 लोक होम क्वारंनटाईन मध्ये आहेत तर 44 हजार 284 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.