ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील चोवीस तासात 7924 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 83 हजार 723 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात 227 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
- महाराष्ट्रात आतापर्यंत 2,21,944 रुग्ण कोरोनामुक्त!
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. काल एका दिवसात 8706 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे आतापर्यंत 2 लाख 21 हजार 944 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 592 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 13 हजार 883 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 57.84 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 3.62 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 9 लाख 22 हजार 637 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 44 हजार 136 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.