ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात रविवारी 3041 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1635 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 1196 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 14 हजार 600 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 33 हजार 988 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबईत 39, पुणे 6, सोलापुर 6, औरंगाबाद 4, लातूर, मीरा-भाईंदर आणि ठाण्यात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये 34 पुरुष आणि 24 महिला रुग्ण आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 3 लाख 62 हजार 862 नमुन्यांपैकी 3 लाख 12 हजार 631 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 50 हजार 231 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 99 हजार 387 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 107 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.