ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी एका दिवसात 6364 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 198 जणांचा मृत्य झाला. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 92 हजार 990 इतकी झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
काल एका दिवसात एकूण 3515 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 1 लाख 4 हजार 687 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.24 टक्के इतके आहे. तर राज्यात एकूण 79 हजार 991 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी नोंद झालेल्या 198 मृत्यूंपैकी 150 मृत्यू मागील 48 तासांमधील आहेत. अन्य 48 मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यात मृत्युदर 4.34 टक्के आहे. तर आतापर्यंत 8376 जणांनी आपला जीव गमावला आहे.
सध्या राज्यात 5 लाख 89 हजार 448 लोक होम क्वारंनटाईन मध्ये आहेत तर 42 हजार 371 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.