ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारच्या वर पोहचली आहे. राज्यात आजच्या दिवशी 82 रुग्णांची भर पडली. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 2064 वर पोहचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकट्या मुंबईत आज 59 रुग्ण सापडले असून आत्तापर्यंत 1357 जणांना कोरोनाची लागून झाली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात पहिला रुग्ण सात मार्च रोजी सापडला होता. त्यानंतर सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉक डाऊन चा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. तसेच महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ही आखण्यात आले आहेत.
आज वाढलेल्या 82 रुग्णामध्ये मुंबईतील 59, पुण्यात 3, ठाण्यामध्ये पाच, मालेगाव मध्ये 12, वसई विरार मध्ये एक आणि पालघरमध्ये दोन रुग्ण वर्गवारी आहे.
तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 217 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.