- सक्रिय रुग्णांनी ओलांडला 6 लाखांचा टप्पा
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान, काल रुग्ण वाढीमध्ये किंचित घट झालेली दिसून आली. असे असले तरी कालची रुग्ण वाढ देखील चिंताजनकच आहे.
मागील 24 तासात राज्यात 58,952 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी ही संख्या 60 हजार 5212 इतकी होती. तर बुधवारी 287 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील बाधितांची एकूण संख्या 35 लाख 78 हजार 160 वर पोहोचली आहे. कालच्या एका दिवसात 39,624 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 29 लाख 05 हजार 721 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.21 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.64 % इतके आहे.
सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 12 हजार 070 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 12 हजार 213 इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा 86 हजार 635 इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या 84 हजार 098 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या 65 हजार 368 इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 44 हजार 880 इतकी आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 28 लाख 02 हजार 200 नमुन्यांपैकी 15.86 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 34 लाख 55 हजार 206 क्वारंटाईनमध्ये असून, 28 हजार 494 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.