ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 1165 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांपार गेली आहे. राज्यात आतापर्यंत 20 हजार 228 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 779 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी राज्यात 48 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 21 पुरुष आणि 27 महिलांचा समावेश आहे. काल दिवसभरात 330 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 3800 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत 12 हजार 864 कोरोनाबाधित आहेत. तर 489 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.