ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. त्यातच मागील 24 तासात 346 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली तर 4 मृत्यू आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 20 हजार 367 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 20,367 कोरोनाबाधित पोलिसांमधील 16,363 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सद्यस्थितीत राज्यात 3,796 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 208 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.