ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 190 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 23 हजार 879 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या एकूण 23,879 कोरोनाबाधित पोलिसांपैकी आतापर्यंत 20 हजार 871 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सद्यस्थितीत राज्यात 2,758 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 250 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.