ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,654 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 3,301 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 170 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 62 लाख 55 हजार 451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,32,56,024 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,47,442 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,92,733 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,337 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 51 हजार 574 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- मुंबई : सध्या 1747 रुग्णांवर उपचार सुरू
मुंबईत मागील 24 तासात 364 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 214 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कालच्या दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,42,765 वर पोहचली असून त्यातील 7,21,471 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 15,968 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पटीचा काळ 1,747 दिवस इतका आहे.