- मागील 24 तासात 55, 469 नवे रुग्ण; 297 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी देखील रुग्ण संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. मागील 24 तासात राज्यात 56 हजार 286 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. तर 376 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 32 लाख 29 हजार 547 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 57 हजार 028 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 36,130 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 26 लाख 49 हजार 757 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.05 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.77 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 5 लाख 21 हजार 317 रुग्ण उपचार घेत आहेत.
- पुण्यात 7,010 नवे बाधित
पुण्यात पुन्हा एकदा रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मागील 24 तासात शहरात 7,010 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण आकडा 3 लाख 12 हजार 382 वर पोहोचला आहे. गुरुवारी 43 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 5 हजार 610 जणांनी आपला जीव गमावला आहे. मृतांची संख्या झाली. तर आता पर्यंत 2 लाख 57 हजार 833 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत 48, 939 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
- मुंबईत 8,938 नवे रुग्ण
मुंबईत गेल्या 24 तासात 8,938 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 23 जणांचा मृत्यू झाला. तर कालच्या दिवसात 4,503 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. तर 3,92,514 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,874 इतकी आहे. सद्य स्थितीत 86 हजार 279 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीत रुग्ण दुपटीचा कालावधी 33 दिवसांचा आहे