ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,237 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 105 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 17 लाख 44 हजार 698 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 45 हजार 914 एवढा आहे.
शनिवारी दिवसभरात 2,707 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 16 लाख 12 हजार 314 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 85 हजार 503 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 92.41 % आहे. तर मृत्यू दर 2.63 % आहे.