ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. काल दिवसभरात 339 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत राज्यातील 5125 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यात मागील 24 तासात 1026 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 24 हजार 427 वर पोहचली आहे. तर एकूण मृतांची संख्या 921 एवढी आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 लाख 21 हजार 645 नमुन्यांपैकी 1 लाख 95 हजार 804 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 24 हजार 427 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 81 हजार 655 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 15 हजार 627 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.