ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 5,011 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 100 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 17 लाख 57 हजार 520 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 46 हजार 202 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 6,608 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 16 लाख 30 हजार 111 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 92.75 % आहे. मृत्यू दर 2.63 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 99 लाख 00 हजार 878 नमुन्यांपैकी 17 लाख 57 हजार 520 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 07 लाख 50 हजार 992 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 5 हजार 354 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- मुंबईत बुधवारी 871 नवे रुग्ण; 1372 जणांना डिस्चार्ज!
मुंबईत काल दिवसभरात 871 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 16 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2,71,525 इतकी झाली आहे. काल दिवसभरात 1372 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर आतापर्यंत 02 लाख 48 हजार 711 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 8,658 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मृतांची संख्या 10,612 पोहोचली आहे.