ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 10,725 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 2 लाख 66 हजार 883 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 61.82 % आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 9601 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 31 हजार 719 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 49 हजार 214 रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी दिवसभरात 322 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 15 हजार 316 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 3.55 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 21 लाख 94 हजार 943 नमुन्यांपैकी 4 लाख 31 हजार 719 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 08 हजार 099 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 38 हजार 947 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.