ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 7,863 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 54 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 लाख 69 हजार 330 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 52 हजार 238 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 6,332 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 20 लाख 36 हजार 790 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.89 % आहे. सद्य स्थितीत राज्यात 79 हजार 093 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 64 लाख 21 हजार 879 नमुन्यांपैकी 21 लाख 69 हजार 330 (13.21%) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 3 लाख 55 हजार 784 क्वारंटाईनमध्ये असून, 3 हजार 558 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.