- कोरोना रुग्णांनी ओलांडला 53 लाखांचा टप्पा
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत राज्यात तब्बल 53,249 जणांनी कोरोनावर मात केली. तर 39,923 नव्या रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवशी 695 जणांनी आपला जीव गमावला असून मृत्यूंचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालणारे ठरले आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 53 लाख 09 हजार 215 वर पोहचली आहे. यातील 47 लाख 07 हजार 980 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 79 हजार 552 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.68 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.5 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 5 लाख 19 हजार 254 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 06 लाख 02 हजार 140 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 47 लाख 07 हजार 980 (17. 35 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34 लाख 82 हजार 425 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर 28 हजार 312 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.