ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 9 हजार 361 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 9,101 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 190 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 57 लाख 19 हजार 457 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.76 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,95,14,858 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 95,72,781नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7,96, 297 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,983 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 32 हजार 241 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- मुंबई : 650 जणांना डिस्चार्ज!
मुंबईत मागील 24 तासात 733 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,21,370 वर पोहचली असून त्यातील 6,88,890 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 14,809 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 15,298 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पतीचा काळ 726 दिवस इतका आहे.