ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 10 हजार 066 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 163 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 57 लाख 53 हजार 290 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.93 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,01,28, 355 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,97,587 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,92,108 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,223 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 21 हजार 859 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- मुंबई : सध्या 14,577 रुग्णांवर उपचार सुरू
मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात 863 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 711 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कालच्या दिवशी 23 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,23,324 वर पोहचली असून त्यातील 6,91,128 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 15,338 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पतीचा काळ 728 दिवस इतका आहे.