ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 511 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 16 हजार 912 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 13 हजार 719 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये 1421 अधिकारी आणि 12 हजार 298 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या 3 हजार 20 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या 3 हजार 20 पोलिसांमध्ये 382 अधिकारी आणि 2638 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात आतापर्यंत तर 173 पोलीस दगावले आहेत. त्यामध्ये 15 अधिकारी आणि 158 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.