ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात राज्यात 6 हजार 600 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 7 हजार 431 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 231 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61%
राज्यात आजपर्यंत एकूण 60 लाख 83 हजार 319 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.
- 77,494 रूग्णांवर उपचार सुरु
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,71,76,715 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,76,057 नमुने (13.3 %) पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,79,553 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,289 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 77 हजार 494 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.