ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या गेले काही दिवसांपासून कमी जास्त होताना दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात 5 हजार 539 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 5 हजार 859 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 187 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 61 लाख 30 हजार 137 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे 96.66 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,91,72,531 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 41 हजार 759 नमुने (12.9%)पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,35,516 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,837 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 74 हजार 483 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.