ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात राज्यात 6 हजार 686 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 5 हजार 861 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 158 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85 %
राज्यात आजपर्यंत एकूण 61 लाख 80 हजार 871 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे.
- 63,004 रूग्णांवर उपचार सुरु
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,05,45,552 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,82,076 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,70,890 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,676 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 63 हजार 004 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.