ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. त्यातच मागील 24 तासात 311 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली तर 5 मृत्यू आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 19 हजार 385 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 19,385 कोरोनाबाधित पोलिसांमधील 15,521 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सद्यस्थितीत राज्यात 3,670 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 194 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.