ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यात राज्यातील पोलीस देखील या विळख्यात सापडले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी 23 हजारांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासात 215 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर आतापर्यंत 23 हजार 033 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 245 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 23,033 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2521 पोलीस अधिकारी आणि 20,512 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 19 हजार 681 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 2108 पोलीस अधिकारी आणि 17,573 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 3107 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 388 पोलीस अधिकारी आणि 2719 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 245 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 25 पोलीस ऑफिसर आणि 220 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.