- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.14 टक्के
ऑनलाईन टीम / मुंबई :
एकीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना राज्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात मागील 24 तासात 12,300 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 5 लाख 14 हजार 790 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 73.14 % आहे.
- कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7 लाख पार
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 10,425 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 03 हजार 823 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 65 हजार 921 रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी दिवसभरात 329 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यू दर 3.24 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 37 लाख 24 हजार 911 नमुन्यांपैकी 7 लाख 03 हजार 823 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 12 लाख 53 हजार 273 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 33 हजार 668 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.