- सक्रीय रुग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 525 वर
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसभरात 15,602 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 88 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 22 लाख 97 हजार 793 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 52 हजार 811 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 7,467 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 21 लाख 25 हजार 211 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.49 % आहे. सद्य स्थितीत राज्यात 1 लाख 18 हजार 525 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 74 लाख 08 हजार 504 नमुन्यांपैकी 22 लाख 97 हजार 793 (13.20%) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 5 लाख 70 हजार 695 क्वारंटाईनमध्ये असून, 5 हजार 031 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.