ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 10,792 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 309 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 15 लाख 28 हजार 226 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 40 हजार 349 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
रविवारी दिवसभरात 10,461 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 12 लाख 66 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 21 हजार 174 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 82.86 % आहे. तर मृत्यू दर 2.64 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 76 लाख 43 हजार 584 नमुन्यांपैकी 15 लाख 28 हजार 226 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23 लाख 10 हजार 783 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 24 हजार 726 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- मुंबईत 22,191 ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबईत कालच्या दिवशी 2199 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 42 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची 2,29,450 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1,93,805 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 9,430 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत 22,919 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.