ऑनलाईन टीम / पुणे :
राज्यात मागील 12 तासात कोरोनाचे नवे 60 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईत 44, पुण्यात 9, नागपूर 4, तर नगर, बुलढाणा आणि अकोल्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1078 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन काळातही नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे ढग गडद होत चालले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील प्रमुख शहरे आता पूर्णतः सील करण्याचा विचार राज्यसरकारचा सुरू असून, काही शहरे अंशतः सील करण्यात आली आहेत.